महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन
सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)
india martindia tourism martindia.org mart agriculture mart agriculture mart agriculture
Martindia
mart agri tourism

सुस्वागतम् - महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)

कृषी व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. कृषी व्यवसायावर जवळजवळ 80 टक्के लोक अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनात भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे 'कृषी पर्यटन'. आजच्या वैज्ञानिक जगतात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कित्येक देशात पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत. आजतागायत आर्थिक कुवत असणारेच पर्यटनाबाबत विचार करु शकत होते. ही संकल्पना आता बदलत असून त्याला नवे रूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, निर्भेळ आनंद. शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्‍याच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार , आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन.

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीदवाक्याला साजेसे कृषी पर्यटन. शहरी जीवनातील दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरांतील नागरिक कृषी पर्यटनाला प्राधान्य देतात आणि त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे,खेडेगांवाकडे वळत आहे. शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेवून ते कृषी पर्यटनाकडे आकर्षीत होत आहेत.

मार्ट ही शिखर संस्था राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व पर्यटन केंद्राची ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र सूची आपल्या पर्यंत पोहोचवत आहे.


हेचि खरे कृषीपर्यटन

वसुधैव कृषक कुटुंबकम |
कृषि पर्यटन आदरातिथ्यम |
झुणका भाकर कांद्यासवे अमृत भोजनम |
वृक्षवल्ली रक्षती भूमिपुत्रम ||१||
कृषि पर्यटनाची हिच ख्याती |
दया क्षमा शांती यांची वसती |
ताईमाई, बालगोपाल आजीआजोबा म्हणती |
मूळ आमचे मातीशी नाते दाखवा
आम्हांस शेती||२||
दुध दुभते, धनधान्य, फळे फुले कोठून येती?
गाय-बैल, म्हैस-शेळी, बैलगाडी कशास म्हणती?
म्हणूनी कृषि पर्यटन त्वरे करा |
षड्ररीपूंचा नित्य नियमे निचरा करा ||३||
होईल तरुण निरोगी 'पर्यटक'
निसर्गासवे तो तर परमात्मा |
जर समीप त्याच्या आला दु:खी शहरी आत्मा |
स्पर्शाने त्याच्या तो बहरूनी गेला |
राग लोभ मदम त्सर विसरूनी गेला ||४||
करारे कृषि पर्यटन | हेचि खरे धन |
आरोग्य, मन:शांती हीच खरी खाण ||५||
उदगार येतील हेचि खचित |
करावया गेलो कृषि पर्यटन |
झाले मातीशी मनोमिलन ||६||
झाले साधू संतांचे देवांचे दर्शन |
साधले आत्मा परमात्म्याचे मिलन |
शेतकरी राजा यासी कारण |
हेचि खरे कृषि पर्यटन ||७||

अॅड. श्री. विजयराव झोळ
(संचालक-सचिव, मार्ट)